वाचा:
विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राव म्हणाले, ‘राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण हे वाढविण्यात येणार आहे. चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण हे आगामी काळात वाढणार आहेत.’
वाचा:
‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठ दिवसांपूर्वीच अशा प्रकारे मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५०० ग्रामपंचायतींपैकी ९० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ८६ टक्के ऑक्टिव्ह रुग्ण होते. या ग्रामपंचायती आणि दोन नगरपालिका भागात सर्वेक्षण करण्यात आले. दोन लाख ३७ हजार नागरिकांपैकी सुमारे ३८ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५३७ रुग्ण हे करोना बाधित असल्याचे निदर्शनास आले. चाचण्या वाढविल्यास रुग्ण आढळून येत असल्याने दोन्ही महापालिका आणि जिल्ह्यात चाचण्या वाढविल्या जाणार आहेत,’ असे राव यांनी स्पष्ट केले.
‘करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे अहवाल हे २४ तासांत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागत आहेत. या प्रकरणी तीन प्रयोगशाळांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. याबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे,’ असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
वाचा:
‘त्या’ रुग्णांना विमा संरक्षण नाही
‘होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांना विम्याचे संरक्षण नाही. त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळत नाही. संबंधित रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतात. त्यामुळे विमा संरक्षण मिळत नाही. अशा रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांचे वेगवेगळे पॅकेज आहेत. त्याबाबत राज्य सरकारकडे माहिती पाठविणार आहे,’ असे राव यांनी सांगितले. ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी सुमारे चार हजार रुग्णांना लाभ मिळाला होता. आता ही संख्या ७२०० झाली आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times