करोना काळात लोक प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करणे टाळत आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाइन खरेदीने जोर धरला असून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. या व्यवसायाचा लाभ उठवण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रीजचा ई-कॉमर्स व्यवसाय अशा सर्वच ई-कॉमर्स कंपन्या सरसावल्या आहेत.
फ्लिपकार्टने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ७० हजार रोजगारांमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि सॉर्टर्स या प्रकारच्या रोजगांराचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या रोजगारांमुळे संलग्न होणाऱ्या दुकानांतूनही अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टने ऑनलाइन घाऊक विक्री सेवा सुरू केली होती. याचा फायदा किराणा दुकानदार, वाणी आणि छोटे व्यापारी यांना होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times