मुंबईः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भाजपात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांच्या ट्विटनंतर संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांना ट्विटरवर टॅग केले आहे. उद्धवजी संजय राऊत यांना आवरा, त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे. तर छत्रपती संभाजी राजे यांच्या ट्विटनंतर लगेच संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटला रिप्लाय देत दुसरे ट्विट केले आहे. आम्ही आपला नेहमीच आदर करतो.. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ? ज्या मुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. या दोन्ही नेत्यामध्ये ट्विट युद्ध पाहायला मिळाले.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले. त्यानंतर संजय राऊत यांनी चार ट्विट केले. आज के शिवाजी नरेंद्र मोदी..असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? शिवाजी महाराजाचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना मान्य आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here