नागपूर: स्टेट बँक ऑफ इंडियाचे चोरट्यांच्या रडारवर असून, गेल्या ४८ तासांत चोरट्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या बँकेच्या चार एटीएममधून लाखो रुपयांची रोख लंपास केली. या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एटीएममधील सुरक्षा व्यवस्थेचीही पोलखोल झाली आहे. चारही एटीएममध्ये चौकीदार नव्हता.

आशीर्वादनगरमधील द्वारका कॉम्प्लेक्समधील पहिल्या माळ्यावर एसबीआयचे एटीएम आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास एक युवक एटीएममध्ये घुसला. त्याने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकले. पीन कोड टाकला. मशिनमधून पैसे बाहेर येताच युवकाने मशिनमध्ये पेचकस टाकला. मशिनमधून एक लाख ६६ हजार रुपये बाहेर निघाले. त्यानंतर मशिन बंद पडली. अलार्म वाजला. या मशीनची देखरेख करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी तेथे पोहोचले. तोपर्यंत चोरटा पसार झाला. आशीर्वादनगर प्रमाणेच चोरट्यांनी याच पद्धतीने हिंगणा टी-पॉइंट, कळमना व म्हाळगीनगरमधील चार एटीएममधून लाखो रुपयांची रोकड केली. निळ्या रंगाचा टी-शर्ट व तोंडाला मास्क लावलेल्या युवकाने ही रक्कम काढल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आशीर्वादनगर वगळता अन्य तीन प्रकरणांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here