म. टा. प्रतिनिधी, पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि यांनी दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याने त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली.

या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा तर, भावे याने दुसऱ्यांदा अर्ज केला होता. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. शरद कळसकर याला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे.

कळसकर याने पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणातील तपासात दिलेल्या कबुली जबाबावरून अॅड. पुनाळेकर आणि भावे यांना मे २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. अॅड. पुनाळेकर यांना जामीन देण्यात आला आहे, तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. ३ सप्टेंबर २०१६ रोजी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर १९ फेब्रुवारी २०१९ रोजी कळसकर व अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here