पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा जंतुनाशक फवारणी करणारा कर्मचारी आहे. क्वारंटाइन सेंटरमधील करोनाबाधित १७ वर्षीय मुलीचा त्याने विनयभंग केला. रिपोर्टनुसार, ९ सप्टेंबर रोजी ही मुलगी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तिला येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आरोपी तरूण क्वारंटाइन सेंटरमध्ये गेला होता. आरोपीने या करोनाबाधित मुलीचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता, त्याने तिच्या कानशिलात लगावली, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
पीडित मुलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यांनी तातडीने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास सुरू आहे.
आणखी बातम्या वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times