कोल्हापूर: विरोधी पक्षनेते यांच्यावर एकमागोमाग एक आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी संवादाची भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळं त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. कालांतरानं त्यांना क्लीन चिटही मिळाली. मात्र, मंत्रिमंडळात पुन्हा त्यांचा समावेश झाला नाही. इतकेच नव्हे तर पक्षातही त्यांचे महत्त्व कमी होत गेले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षानं तिकीटही दिलं नाही. त्यामुळं खडसे प्रचंड अस्वस्थ होते. यापूर्वीही त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. मात्र, भाजपचं सरकार येऊ न शकल्यानं खडसे आक्रमक झाले आहेत.

वाचा:

खडसे हे आता फडणवीसांचं नाव घेऊन टीका करू लागले आहेत. ‘फडणवीस हे ड्राय क्लीनर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवू लागले आहेत. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळंच राज्यात भाजपची सत्ता आली नाही की काय, याचा मी शोध घेत असल्याचा टोलाही खडसे यांनी फडणवीसांना हाणला होता. करोनाचे वातावरण संपल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाचा:

खडसे यांचे आरोप व अस्वस्थतेबद्दल पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘खडसे यांच्याशी पक्षातील काही मंडळींनी संवाद साधला आहे. त्यामुळं लवकरच सर्व काही नीट होईल. खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. दाऊदच्या पत्नीचे आणि नाथाभाऊंचे संभाषण झाल्याचा आरोप होता. त्यामध्ये २४ तासांत त्यांना क्लीन चिट मिळाली. ज्या एमआयडीसी भूखंड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दोषी नसल्याचा निर्वाळा दिला. सर्व प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवल्यानंतर उठसूठ फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी आता संघर्षाऐवजी संवादाची भूमिका घ्यावी,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

वाचा:

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर आरोप करताना ते म्हणाले, ‘ज्यावेळी गरज होती, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विचारात घेतले नाही, आता न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर धावपळ सुरू आहे. तरीही मराठा आरक्षण प्रश्नी भाजप सरकार सोबत आहे. सरकारला या प्रकरणात जे सहकार्य लागेल ते करायला आम्ही तयार आहे.’

केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत ते म्हणाले, ‘उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मिळून अनुदान द्यावे. त्याबाबत आज शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय होईल’, अशी अपेक्षा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here