भारताच्या रेग्युलेटरी ऑथॅरिटीने परवानगी दिल्यानंतर लस पुरवठा करण्यात येणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) भारतीय उत्पादकांशी लसीचे ३०० दशलक्ष डोस उत्पादन करण्याचा करार केला आहे. डॉ. रेड्डी लॅबोरेटरी ही भारतातील एक प्रमुख औषध कंपनी आहे. रशियन लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडून घेण्यात येणार आहे. भारतात २०२० या वर्षाच्या अखेरीस लस पुरवठा सुरू होऊ शकतो असे ‘आरडीआयएफ’ने म्हटले आहे. लस पुरवठ्याबाबत भारतातील नियामक प्राधिकरणाची परवानगी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाचा: वाचा:
‘आरडीआयएफ’ ने आणखी चार भारतीय कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. या कंपन्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे उत्पादन रशियातच करणार आहेत. करोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी अनेक लशींवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध देश आणि औषध कंपन्यांचे असल्याचे आरडीआयएफने म्हटले.
वाचा:
वाचा:
रशियाने ऑगस्ट महिन्यातच लस विकसित झाल्याची घोषणा केली होती. अशी घोषणा करणारा रशिया हा पहिला देश ठरला. मात्र, पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर रशियाने आपल्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीची परदेशी संस्थेच्या देखरेखीत व्यापक चाचणी घेण्याची तयारी दर्शवली. या चाचणीचे परिणाम निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असल्याचे ‘द लॅसेन्ट’ या वैद्यकीय नियतकालिकेत नमूद करण्यात आले होते.
रशियाने आपली ‘स्पुटनिक व्ही’ ही लस साामान्य रशियन नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. लशीची पहिली खेप वितरीत करण्यात आली आहे. त्याशिवाय कझाकस्तान, ब्राझील, मेक्सिकोमध्येही रशिया आपली लस देणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times