नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी प्रकरणी कडकड्डुमा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. स्पेशल सेलने आरोपी ताहिर हुसेनसह १५ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र, या आरोपपत्रात उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या नावांचा समावेश नाही. पोलिसांनी २ दिवसांपूर्वी उमरला खालिदला अटक केली होती.

दिल्ली दंगल प्रकरणी ज्यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे त्यांच्या नावांचा नंतर समावेश करण्यात येणार आहे. हे आरोपपत्र एकूण १७,५०० पानांचे आहे. दिल्ली दंगल प्रकरणात एकूण ७४७ जणांना साक्षीदार केलं आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UAPA कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केलंय. दिल्ली दंगल प्रकरणी स्पेशल सेलच्या एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत होती.

ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणी सर्व एफआयआरचा अभ्यास केला आहे. या प्रकरणात आम्ही पूरक आरोपपत्र दाखल करू. यामध्ये इतर काही नावांचा (ओमर खालिद आणि शर्जील इमाम) समावेश असेल, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

दिल्ली हिंसाचार प्रकरणात एकूण ७४७ जणांना साक्षीदार केलं आहे, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. २,६९२ पानं आरोपपत्राचा ऑपरेटिव्ह भाग आहेत. तर संपूर्ण आरोपपत्र हे १७,५०० पानांचे आहे.

आणखी काही आरोपींविरोधात चौकशी सुरू असल्याचं दिल्ली पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. दंगल भडकवण्यासाठीचे पुरावे आमच्याकडे आहेत. यात व्हॉट्सअॅप चॅट, तांत्रिक पुरावे आणि इतर कागदपत्रंही आहेत. आरोपपत्रासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार या दोघांकडून परवानगी मिळाली आहे, असं पोलिसांनी कोर्टात स्पष्ट केलं.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ताहिर हुसेनसह १५ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपी ताहिर हुसेन, मुहम्मद परवेझ अहमद, मुहम्मद इलियास, सैफी खालिद, इशरत जहां, मीरान हैदर, सफुरा जरगर, सफा उर रहमान, आसिफ इक्बाल तन्हा, शादाब अहमद, नताशा नरवाल, देवांगना कलिता, तस्लीम अहमद, सलीम मल्लिक, अथर खान यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here