मुंबई: या २६ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची अदलाबदल केली गेली. यात सायन रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची स्पष्ट कबुली मुंबई महापलिका आयुक्तांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी दिली.

वाचा:

अंकुश सुरवडे या तरुणाचा २८ ऑगस्ट रोजी पूर्व द्रूतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण १४ सप्टेंबर रोजी अंकुशचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यानंतर अंकुशचे नातेवाईक व मित्रपरिवार तातडीने रुग्णालयात गेले. तेव्हा अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक्रिया करुन टाके घालण्यात आले होते असे त्यांच्या लक्षात आले. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रुग्णालयाकडून कोणताही समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही. दरम्यान, अंकुशचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. दोन तासानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकुन दुसऱ्यांनाच देण्यात आला व त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायन रुग्णालयाच्या या धक्कादायक काराभाराविरुद्ध विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सायन रुग्णालयाबाहेर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची आयुक्तांनी तातडीने दखल घेतली.

वाचा:

पालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, पालिकेचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे तसेच सुरवडे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, अंकुश या युवकाच्या डोक्याला मार लागला असताना त्याचे ऑपरेशन का केले, याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी दिले आहे. मात्र रुग्णालयातील संबंधित विभागात किडनीचा गैरव्यवहार होतो, असा कुटुंबीयांचा संशय असून त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

वाचा:

अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे सुरवडे प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये आरोग्य खात्यातील तज्ञ व पोलीस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. या समितीत सर्वपक्षीय नगरसेवक असावे, अशी विनंतीही आम्ही यावेळी आयुक्तांकडे केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here