आपल्याला कालपासून काहीसा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. यानंतर आपण डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानंतर आपण करोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आर्शीवादामुळे सध्या माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वतःला आयसोलेट केलं आहे, असं यांनी ट्विट करून सांगितलं.
आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी. करोना संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करावं, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत ७ केंद्रीय मंत्री करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीही करोनाबाधित झाले आहेत. तर संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३० खासदार करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, प्रवेश साहिब सिंह वर्मा, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, राम शंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांचा यात समावेश आहे.
देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ५० लाखांवर गेलीय. त्यापैकी ३५ लाखांहून अधिक जण करोनामुक्त झालेत. पण करोनाने देशात आतापर्यंत ८२ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. करोनाने आज तिरुपतीचे खासदारांचे निधन झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times