वाचा:
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर यासंदर्भात पुढील आदेश होईपर्यंत राज्य सरकारने नोकर भरती थांबवावी, विद्यार्थ्यांना सध्या ज्या सवलती मिळतात त्या सुरू ठेवाव्यात, याबाबत तीन दिवसात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने चार दिवसांपूर्वी केली होती. बुधवारपर्यंत यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, उलट पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
वाचा:
आज सकाळी नऊ वाजल्यापासून मुंबई आणि पुण्याकडे कोल्हापुरातून जाणारा करण्यात येणार आहे. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे. यामध्ये ५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यांनी दहा मागण्यांचं एक पत्र मुख्यमंत्री यांना पाठवलं आहे.
वाचा:
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बुधवारी झाली. या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत उभं राहण्याचा शब्द दिला. मराठा आरक्षण कायदा हा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने केलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला विरोधी पक्षांसह, विविध पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. मराठा आरक्षणाबाबत कायद्याच्या लढ्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल असे प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times