वाचा:
तालुक्यातील प्रयाग चिखली येथील अमृता मुंबईत होती. गर्भवती झाल्यानंतर ती प्रसूतीसाठी माहेरी आली. त्यातच एक दिवस अचानक तिच्या पोटात दुखू लागले. ती डॉक्टरांकडे गेली. पण करोनाचा अहवाल आल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. त्यानुसार तिचा स्वॅब तपासणीसाठी दिला गेला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि नव्या संकटाची मालिका सुरू झाली.
वाचा:
रुग्णालयात तिला दाखल करून न घेतल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली. अनेक दवाखान्याचे उंबरे झिजवल्यानंतर शेवटी एका डॉक्टरला दया आली. त्याने तिच्यावर उपचार केले. तिची प्रसूती सुरळीत झाली. एका गोंडस कन्येला तिनं जन्म दिला. पण तिला ठेवायचे कुठे हा प्रश्न नातेवाईकांना पडला. यावेळी कोल्हापुरात व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जैन बोर्डिंग येथे सुरू केलेले कोविड सेंटर त्यांच्या मदतीला धावले. मध्यरात्री दोन वाजता आई आणि बाळाला या केंद्रात दाखल करण्यात आले.
वाचा:
तेरा दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर या मातेने करोनावर मात केली. डॉ. आबाजी शिर्के, हिना यादवाड, व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे यांनी तिची काळजी घेतली. तेरा दिवसांनी कोविड सेंटरमध्येच तिच्या बाळाचे बारसे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सेंटरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली. सनईचे सूर, फुलांची उधळण आणि उत्साही वातावरणात बारसं झालं. नवजात कन्येला शुभ्रा हे नाव देण्यात आलं. विशेष म्हणजे आतापर्यंत या सेंटरमध्ये ज्यांनी करोनावर मात केली त्या सर्व सर्व महिला यावेळी उपस्थित राहिल्या. या नामकरण समारंभास या कन्येचे मानस आजोबा अशोक रोकडे आणि व्हाइट आर्मीचे सगळे जवान मामा म्हणून आणि नर्सिंग स्टाफ आत्या म्हणून उपस्थित होत्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times