वाचा:
(वय ४०), असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे तर (वय ३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. तीन दिवसांपूर्वी रेती चोरी प्रकरणात चौधरी यांनी कमलेश याच्या भावाला अटक केली. त्यामुळे कमलेश हा संतापला होता. बुधवारी रात्री कन्हानमधील एका चौकात कमलेश याने रवींद्र यांना गाठले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. याबाबत माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
वाचा:
पोलिसांनी जखमी रवींद्र यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगेचच नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कन्हानमधील डॉक्टरांनी दिली. त्यानंतर जखमी रवींद्र यांना शंकरनगर चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कन्हान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून कमलेश याचा शोध सुरू केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times