दौलत बेग ओल्डी (DBO) ही भारत आणि चीनमधील सर्वात सामरिक आणि बहुदा सर्वात महत्त्वाची चौकी आहे. भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यानच्या तणावामुळे इथे एप्रिल अखेर आणि मेच्या सुरूवातीच्या काळापासून बंद आहे.
‘मी नुकतीच डीबीओला भेट दिली आहे. कारु ते तांगलपर्यंतच्या भागात शाश्वत भूजलाच्या शोधासाठी आम्ही सुमारे २८ दिवस काम केलं, असं प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ आणि डॉक्टर रितेश आर्य यांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंय. आर्य यांनी यापूर्वी सियाचीन ग्लेशियर आणि बटालिक हाइट्सवर भारतीय लष्करासोबत काम केलं आहे.
डॉ. रितेश आर्य यांनी यापूर्वी पूर्व लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ वाळवंटात तैनात असलेल्या लष्करासाठी भूगर्भातील जलसाठा यशस्वीरित्या शोधून काढला. “गलवान खोऱ्याशिवाय पँगाँग त्सो, लुकंग, थाकुंग, चुशूल, रेझांग ला आणि तांगसेमध्येगी आम्हाला यश आलं आहे, असं आर्य म्हणाले.
डीबीओमध्येही पाणी मिळेल, अशी आशा भूगर्भशास्त्रज्ञ आर्या आणि भारतीय लष्कराला आहे. ‘डीबीओमधील भूजल स्त्रोतांच्या शोधाच्या संदर्भात पेलिओ जलवाहिनीच्या विकासासाठी जलविज्ञानशास्त्रीय परिस्थिती ( हायड्रो-जिओलॉजिकल ) अनुकूल आहे. आम्हाला खोलवर बोरिंग करावे लागेल. जवानांसाठी पाणी शोधण्याचा आम्हाला विश्वास आहे.
सुमारे १०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या डीबीओमध्ये उपस्थित पेलिओ तलावाच्या पुनर्बांधणीसाठी आशावादी आहेत. पेलिओ तलावाची पुनर्बांधणी केल्याने एकीकडे जवानांचे मनोबल वाढेल आणि आगामी काळात पर्यटनाला चालनाही मिळेल, असं डॉ. रितेश आर्य म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times