संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढायला लागले असताना शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये चाचण्यांही तितक्याच वेगाने वाढवण्याची गरज आहे. करोना पॉझिटिव्ह निदान झाल्यानंतर त्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किमान १५ व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश असूनही मनुष्यबळाची कमी, प्रवासामध्य़े लागणारा विलंब, कर्मचाऱ्यामधील वाढता संसर्ग अशा अनेक कारणांमुळे हे उद्दीष्ट्य साध्य होण्यामध्ये अनेक अडसर येत आहेत. मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये बाधितांच्या एकूण संपर्कात आलेल्या २९ हजार ६२८ जणांच्या करण्यात आल्या आहे. थेट संपर्कात आलेल्या एकूण व्यक्तींचे प्रमाण हे २६,०१४३८ इतके नोंदवण्यात आले आहे. थेट संपर्कात आलेल्या १६ हजार ३०४ जणांच्या तर कमी धोका असलेल्या १३ हजार ३२४ जणांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे.
आतापर्यंत मुंबईमध्ये २२, ७९९३७ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर आता घरामध्ये विलगीकरणात असलेल्यांची संख्या ३,१९०८२ इतकी नोंदवण्यात आली आहे. मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या व्याधी आहेत, अशा व्यक्तींन तातडीने शोधून त्यांच्याना वैद्यकीय उपचार देण्यावर भर दिला जात आहे. अशा १०,००५५४ ज्येष्ठ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यात ऑक्सिजनचे प्रमाण ९५पेक्षा कमी असलेल्यांचे प्रमाण ९,९७३८२ इतके आहे.मुंबईमध्ये १७,१९४९ करोना रुग्णांची नोंद झाली असून करण्यात आलेल्या तपासण्यांची संख्या ही ९,३६५७४ इतकी आहे. प्रती दशलक्ष तपासण्यांची संख्या ही ७२,००२ इतकी नोंदवण्यात आली आहे. मुंबईशी तुलना करता बेंगळूरूमध्ये १,७३६२८ रुग्णसंख्येची नोंद झाली असून येथे चाचण्यांची संख्या ही १,२३५ ८८० इतकी आहे, प्रती दशलक्ष या चाचण्या ९५,०६८ इतक्या करण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये रुग्णसंख्या २,०११७४ इतकी असली तरीही चाचण्यांची संख्या ही १९,०३७६२ इतकी आहे, तर गुजरामध्ये ११,४८३४ रुग्णसंख्येची नोंद होऊन झालेल्या चाचण्या या ३३,५७९७७ इतके आहे. मुंबईमध्ये १७,१९४९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ९ लाख ३६ हजार ५७४ तपासण्या करण्यात आल्या आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता तपासण्यांचे प्रमाण १८.३५ टक्के इतके आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times