अमेरिकेत तीन नोव्हेंबरला होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भारतीय वंशाच्या मतदारांची भूमिका नेमकी काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘इंडियास्पोरा’ आणि एशियन अमेरिकन्स अॅण्ड पॅसिफिक आयलॅँडर्स’ (एएपीआय) या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भारतीय मूळ असलेल्या मतदारांचा पाठिंबा अजूनही बायडन यांनाच असल्याचे म्हटले असले तरी, कुंपणावर असलेल्यांची आयत्या वेळची भूमिका चित्र पालटू शकते. बायडन (वय ७७) यांचे समर्थन कमी करण्याचा प्रयत्न ट्रम्प (वय ७४) करीत आहेत. बायडन यांचा भारतीय-अमेरिकी समुदायाशी दीर्घकालीन संपर्क आहे. त्याशिवाय त्यांनी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस (वय ५५) यांना आपल्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार जाहीर करून या मतपेढीला आकर्षित केले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, बायडन यांना ६६ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांच्या बाजूने २८ टक्के जनता आहे. सहा टक्के अजून कुंपणावर आहेत.
वाचा:
दरम्यान, पेनसिल्व्हानिया, मिशिगन, फ्लोरिडा आणि उत्तर कॅरोलिना या राज्यात भारतीय अमेरिकी मतदारांची मते निर्णायक आहेत. क्लिंटन यांना २०१६मध्ये जे समर्थन मिळाले होते, त्यात गेल्या चार वर्षांत १९वरून १६ इतकी घट झाल्याचे निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदविले आहे. भारतीय अमेरिकी मतपेढीतील कुंपणावर असलेल्यांचा टक्का ३० पर्यंत गेला तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाजूने समर्थन झुकू शकते. ताज्या सर्वेक्षणातून हा कल समोर आला आहे. ट्रम्प यांचेही या समुदायावर विशेष लक्ष आहे असे एएपीआयचे संस्थापक प्रा. डॉ. कार्तिक रामकृष्णन यांनी सांगितले.
वाचा:
वाचा:
बायडन यांचा फ्लोरिडात प्रचार
किस्सीम्मी : अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी फ्लोरिडात दौरा करून मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशाचे भविष्य तुम्ही ठरवू शकता. ते तुमच्या हाती आहे. ट्रम्प यांनी राज्यातील समस्यांकडे, नागरिकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या राज्यात दोन्ही उमेदवारांत चुरशीची लढत होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, फ्लोरिडातील अब्जाधीश माइक ब्लूमबर्ग यांनी ट्रम्प यांना हरविण्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे.
वाचा:
>> अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशांची पसंती
वर्ष २०१६:
हिलरी क्लिंटन – ७७ टक्के
डोनाल्ड ट्रम्प – १६ टक्के
वर्ष २०१२:
बराक ओबामा- ८४ टक्के
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times