गुणसूत्रांमध्ये बदल करून पहिला ” तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. त्याचा वापर करून होणाऱ्या पुनरुत्पादनामधून वाढत्या जागतिक लोकसंख्येची भागवण्यास मदत होईल.
‘पीएनएएस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार उपयुक्त पशूंच्या गुणधर्मामध्ये आवश्यक ते बदल करणे शक्य असून, कृत्रिम रेतन अवघड असलेल्या शेळीसारख्या प्राण्यांच्या पुनरुत्पादनात या संशोधनाचा वापर होऊ शकेल. अन्नपदार्थांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला हव्या त्या गुणधर्माचा प्रसार या तंत्रज्ञानातून होऊ शकेल, असे वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ जॉन ओटले यांनी म्हटले आहे. एकदा गुणसूत्रांचे नियंत्रण शक्य झाले की कमी पाणी, कमी चारा आणि छोट्या मात्रेत प्रतिजैविके देऊन काम भागेल, असे ते म्हणाले.
वाचा :
वाचा :
या संशोधकांनी ” तंत्रज्ञान वापरून हे यश मिळवले आहे. संबंधित प्रजातीतील नराच्या गर्भावस्थेत हे प्रयोग करून असे पशू तयार करण्यात आले आहेत. उंदीर, डुकरे, शेळ्या आणि गुरांमध्ये हे प्रयोग करून हे ” नसलेले नर तयार केले गेले. हे नर करू न शकणारे, मात्र निरोगी होते. त्यांच्या शरीरात आवश्यक गुणधर्मांच्या अन्य नराच्या शुक्राणू तयार करणाऱ्या टाकण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी बदललेल्या गुणधर्मांनुसार शुक्राणू तयार करण्यास सुरुवात केली. उंदरांवर हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. भविष्यात अन्य प्राण्यांवर प्रयोग करून प्रत्यक्ष फलन आणि कृत्रिम रेतनाच्या मर्यादांवर मात करता येईल, अशी शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times