मुंबई: करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून सातत्यानं राज्य सरकारला प्रश्न विचारणाऱ्या व विविध उपाय सुचवणाऱ्या मनसेनं आता मुंबईतील बेस्ट बसमधील गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून मनसेचे सरचिटणीस यांनी सरकारला एक प्रश्न केला आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग सध्या वाढत आहे. गर्दी टाळणे हा त्यावर प्रभावी उपाय असल्यानं अनलॉक झाल्यानंतरही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. बेस्ट बसमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रवास केला जावा, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोकल सेवा बंद असल्यामुळं गर्दीचा अतिरिक्त भार बस सेवेवर येत आहे. त्यामुळं बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात असल्याचं दिसत नाही.

वाचा:

लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी सातत्यानं होत आहे. मात्र, गर्दीचं आणि संसर्गाचं कारण देऊन राज्य सरकारनं अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. तोच धागा पकडून देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात प्रवासी एकमेकांना खेटून उभे राहिलेले दिसतात. बसच्या दरवाजावरही लोक उभे असलेले दिसतात. बसवाहकही हतबल झालेले यातून दिसत आहे. ‘बसच्या गर्दीत होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे. रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पश्चिम रेल्वेवर बोरिवलीच्या पुढील भागांत राहणाऱ्या व मध्य रेल्वेमार्गावर ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या नागरिकांची कार्यालयात जाताना प्रचंड गैरसोय होत आहे. ‘अनलॉक’नंतर कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आली असली तरी तिथपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे. त्यामुळं लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेनं केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here