बीजिंग: भारत आणि चीनदरम्यान असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. तर, दुसरीकडे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण भागात दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने उभे ठाकले आहेत. भारतीय जवानांनी चिनी सैन्याच्या आगळीकीला प्रत्युत्तर देताना आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला मोठा झटका बसला आहे. भारतीय सैन्याने उंच ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. भारतीय जवानांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास चिनी सैन्याला हे महागात पडू शकते असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ वृत्तपत्रात तज्ञांनी चीनला हा इशारा दिला असून उंच डोंगराळ भागातील युद्धात जवानांचे प्राण जातात असे सांगितले आहे. वृत्तानुसार, अधिक उंचावर असलेल्या सैन्याला शत्रूंपेक्षा अधिक फायदा असतो. उंचावर बसलेल्या सैन्यावर निशाणा साधणे कठीण असते. जमिनीवरून ३० व्या मजल्यावर हल्ला करण्यासारखा हा प्रकार असतो, असे तज्ञांनी सांगितले. भारताने ६७०० मीटर उंच असलेल्या सियाचीन ग्लोशियरमध्ये १९८४मध्ये लष्करी कारवाई केली आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी आहे. सध्या तणाव सुरू असलेला चुशुल हा पाच हजार मीटर उंच आहे.

वाचा:

इतक्या उंचावरील सैन्यावर हल्ला करणे अधिकच घातक असते. इतक्या उंचावर चढणे देखील कठीण असते. जेवढ्या अधिक उंचावर जाऊ तेवढाच श्वास घेण्यास त्रास होत असतो. त्याशिवाय सैन्याकडे असलेल्या सामानांचे वजनही अधिक असते.
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने भारताचे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर दिपक सिन्हा यांच्या हवाल्याने सांगितले की, जमिनीवरून उंचावर हल्ला करायचा असेल तर किमान ९ जवानांची आवश्यकता भासणार.

वाचा:

चीनकडून हलक्या वजनाच्या शस्त्रांची चाचणी

चीनने मागील काही दिवसांमध्ये ४६०० मीटर उंचावर कमी कॅलिबरच्या Howitzer सोबत सराव केला. Howitzer ला सहाऐवजी चार चाकी वाहनावर ठेवण्यात आले होते. तर, ट्रकवर असणाऱ्या HJ-10 देखील चारऐवजी दोन लाँचरसह होती. डोंगराळ प्रदेशात या शस्त्रांना घेऊन जाण्यासाठीच त्यांचे वजन कमी करण्यात आले असल्याची चर्चा आहे. या हत्यारांना हवाई मार्गाद्वारे ही नेण्यात येऊ शकते असे म्हटले जाते.

डोकलामजवळ चीनची हालचाल

चीनकडून एका बाजूला शांततेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी सैन्याची संख्या वाढवली आहे. चीनने डोकलामपासून ३३० किमी अंतरावर असलेल्या विमानतळाला अपग्रेड करण्यास सुरुवात केली असल्याचे सॅटेलाइट छायाचित्रांतून समोर आले आहे. या ठिकाणी एअरक्राफ्ट शेल्टर तयार करण्यात येत असून या ठिकाणी चीनच्या हवाई दलाला मोठी मदत होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here