नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार यांनी यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सकाळीच सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. सकाळी ७.१५ च्या सुमारास राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच बेरोजगारीच्या मुद्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस (#NationalUnemploymentDay) ट्रेन्डमध्ये सहभागी होत त्यांनी मोदी सरकारला कोपरखळी मारलीय.

वाचा :

वाचा :

‘मोठ्या प्रमाणात बेरोजगारीमुळे तरुणांना आज साजरा करावा लागतोय. रोजगार हा सन्मान आहे. सरकार केव्हापर्यंत हा सन्मान देण्यापासून मागे हटत राहणार?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारलाय.

७० व्या वाढदिवसानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज देश – विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’च्या रुपात साजरा केला जातोय. बेरोजगारीच्या मुद्यावर सोशल मीडियावर सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याचमुळे ट्विटवरवर #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस आणि #NationalUnemploymentDay असे दोन ट्रेन्डही सध्या पाहायला मिळत आहेत.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here