माले: जगभरातील गरीब आणि लहान देशांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटणाऱ्या चीनचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे. कर्जाच्या मोठ्या रक्कमेखाली अनेक देशांचे हात अडकत चालले आहे. भारतासाठी महत्त्वाचा असणारा मालदीवही चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. मालदीववर चीनचे ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. तर, मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पाच अब्ज डॉलरची आहे. करोनाच्या संकटात मालदीवची अर्थव्यववस्था संकटात सापडली आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटन उद्योगावर आधारीत आहे. करोनाच्या संकटामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मालदीवला पर्यटनापासून दरवर्षी सुमारे दोन अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळते. परंतु करोनामुळे उत्पन्नात एक तृतीयांश घट होण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट कायम राहिल्यास मालदीवला ७० कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागू शकते.

वाचा:

मालदीवचे माजी पंतप्रधान आणि संसदेचे विद्यमान अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी सांगितले की, देशावर चीनचे एकूण ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. यामध्ये सरकार दरम्यानचे कर्ज, सरकारी उद्योगांना दिलेल्या कर्ज, खासगी उद्योगांच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी मालदीव सरकार हमी दिली आहे. मालदीव सरकार चीनच्या या जाळ्यात अडकू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

नशीद यांनी ज्या प्रकल्पांसाठी चीनकडून कर्ज घेतले गेले त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या प्रकल्पातून सरकारला किती महसूल मिळणार, त्यातून कर्जाची रक्कम कशी फेडली जाणार, आदीबाबत विचार करण्यात आला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीनच्या मदतीने सुरू असलेल्या अनेक प्रकल्पातील खर्चही वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष २०१३ मध्ये मालदीवमध्ये चीन समर्थक असलेल्या अब्दुला यामीन यांच्या सरकारने ॉमोठ्या प्रकल्पांच्या नावावर चीनकडून कर्ज घेतले होते. हेच कर्ज आता सध्याच्या सरकारसमोरील मोठे संकट ठरले आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

वाचा:

मालदीव जर चीनचे कर्ज फेडण्यास अपयशी ठरला तर त्याची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, अशी भीती नशीद यांनी व्यक्त केली. श्रीलंकेलाही चीनचे कर्ज फेडता न आल्यामुळे त्यांना आपले महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला ९९ वर्षांच्या भाडेकरारावर द्यावे लागले आहे. मालदीवमधील एखादे बंदर, प्रकल्प चीन सरकार आपल्या कंपनीच्या मार्फत ताब्यात घेण्याचा विचार करू शकतो. लाओस देशातील पॉवर ग्रीडमध्ये चीनच्या सरकारी कंपनीने अशाच प्रकारे शिरकाव केला आहे.

भारतासाठी धोका ?
मालदीवही कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यास भारतासाठी ही धोका निर्माण होऊ शकतो. ९० हजार चौकिमी क्षेत्रफळावर पसरलेला मालदीव देश भारतासाठी खुपच महत्त्वाचा आहे. मालदीवच्या समुद्र सीमेलगत भारतीय बेट मिनिकॉयचे अंतर फक्त १०० किमी आहे. तर, केरळच्या दक्षिण भागापासून मालदीवच्या बेटांचे अंतर फक्त ६०० किमी आहे. चीनकडून भारताची हिंदी महासागरात कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालदीवचे सामरिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन चीनने या देशाला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन या देशावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये २०१८ मध्ये नवीन सरकार आल्यानंतर चीनसोबत कोणताही मोठा करार करण्यात आला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here