उत्तर इंग्लंडमधील यॉर्कशायर शहरातील डॉनकास्टर येथे राहणाऱ्या कुटुंबावर हे संकट कोसळले. स्टीफन जोयनेस (३५) आणि अबिगाइल अॅलिस (२७) हे मागील काही दिवसांपासून प्रचंड आनंदात होते. अॅलिसने १२ दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्यांचा आनंद हा फारकाळ टिकला नाही. त्यांनी मागील काही वर्षांपासून पाळलेल्या टॅडी या श्वानाने त्यांच्या १२ दिवसाच्या मुलाचे प्राण घेतले.
वाचा:
रविवारी, अॅलिस आणि जोयनेस यांचा १२ दिवसाचा मुलगा झोपला होता. त्याच दरम्यान दोघांचेही लक्ष त्याच्यावरून हटले. त्यावेळी घरासमोरील बागेत खेळणाऱ्या टॅडीने अचानक घरात उडी मारली आणि लहान बाळावर हल्ला केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून अॅलिस आणि जोयनेस त्याच्याकडे पोहचेपर्यंत बाळ रक्तबंबाळ झाले होते. उपचारासाठी बाळाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वाचा: वाचा:
घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कसेबसे श्वानावर नियंत्रण मिळवले आणि व्हॅनमधून त्याला घेऊन गेले. त्यानंतर या बाळाच्या आई वडिलांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल अटक करण्यात आली. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अॅलिसच्या वडिलांचे निधन झाले होते. टॅडी श्वान हा साधारणपणे शांत असायचा.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times