मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे आयातीचा खर्च कमी होणार आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात केली. रविवारी कंपन्यांनी पेट्रोल १० ते १२ पैसे आणि डिझेल ६ ते ७ पैसे कपात केली होती.
मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.३९ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७२.४२ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७५.८० रुपये मोजावे लागत असून डिझेल ६९.०६ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७८.३९ रुपये आणि डिझेलचा भाव ७१.४३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७८.७६ रुपये आणि डिझेल ७१.४३ रुपये मोजावे लागतील.
भारतात खनिज तेलाची एकूण मागणीच्या ८० टक्के आयात करण्यात येते. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दर निश्चित करताना चलन विनिमय दर महत्वाचा ठरतो. जागितक कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) १३ सेंटसने कमी झाला. खनिज तेलाचा भाव सध्या ६४. ८५ डॉलर प्रति बॅरल आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times