कदमवाडी येथे राहत असलेल्या एका महिलेचा तपासणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला उपचारासाठी नातेवाईकांनी महाराणा प्रताप चौकातील केपीसी या कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दोन-तीन दिवसांनंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला तेथील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा तिच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. त्यामध्ये चार तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमची कानातील फुले व दोन ग्रॅमच्या बुगड्या असे सात तोळ्यांचे हे दागिने होते. या प्रकरणी अडीच लाखांचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
काही दिवसांपूर्वी करोनाचे उपचार घेताना एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावरील दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणाचा अजूनही तपास लागला नाही. काही व रूग्णालयात मोबाइलसह किंमती साहित्य चोरीस जात आहे. यामुळे उपचारास दाखल होणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
आणखी बातम्या वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times