अहमदनगर: नगरमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आज पालकमंत्री यांच्याकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी करावा का? असा मुद्दा मांडला. मात्र, आता लॉकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट करतानाच, जर सगळ्या नागरिकांचा विचार असेल तर तुम्ही जनता कर्फ्यू करू शकता,’ असे मुश्रीफ म्हणाले.

नगरमध्ये करोना बाधितांचे संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील काही तालुके व शहराच्या हद्दीत स्वतःहून नागरिक बंद करत आहेत. नगर शहरांमध्येही लॉकडाऊन करावा, अशी मागणी काही जणांकडून होत आहे. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमदार जगताप, महापौर वाकळे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाचा:

ते म्हणाले, ‘बैठकीमध्ये महापौर आणि आमदार यांनी पुन्हा लॉकडाऊन करावा का ? असा मुद्दा मांडला. मात्र आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून लॉकडाऊन करणे याला विरोध केला आहे. पण स्थानिक स्तरावर जनता कर्फ्यू पुकारला जाऊ शकतो. त्यासाठी मी महापौरांना सांगितले आहे की, त्यांनी सर्व लोकांना एकत्र करून याबाबत निर्णय घ्यावा. मी माझ्या मतदारसंघात जनता कर्फ्यू केला होता. पण त्यात एक अडचण अशी आहे की, बंद करणार म्हटलं की एक दिवस अगोदर व बंद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी नागरिकांची बाजारात गर्दी होती. त्यामुळे आपण जे दहा दिवसात घरात राहून ककमवायचे ते एका दिवसात घालवायचे, अशी परिस्थिती होते. आता केंद्र सरकारने लॉकडाऊन करायचे नाही, हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन यामध्ये भाग घेणार नाही. मात्र सर्व जनता मिळून बंद करणार असेल, तर प्रशासन सहकार्य करेल. आमच्या कोल्हापूर येथे जेव्हा जनता कर्फ्यु बाबत बैठक झाली, तेव्हा ५० टक्के लोकांनी विरोध केला, मतभेद झाले. त्यामुळे असा निर्णय घेताना एकत्र बसून घ्या. तुमचा जो निर्णय असेल त्याला पालकमंत्री म्हणून माझे सहकार्य असेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले

वाचा:

मी तुमचा हमाल – मुश्रीफ

दरम्यान, नगर जिल्ह्यात सध्या के के रेंज जमीन अधिग्रहणाचा प्रश्न गाजत आहे. याबाबतही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘याबाबत जिल्ह्यातील जनतेचे जे मत असेल तेच माझे मत आहे. मी तुमचा हमाल आहे. त्यामुळे मला वेगळे मत असण्याचं काही कारण नाही. के के रेंज प्रश्नाबाबत सर्व नेतेमंडळी एकत्र असतील तर आपल्याला मोठा लढा उभारावा लागेल. संरक्षण विभागाने के के रेंज जमीन अधिग्रहण करायचे ही भूमिका घेतली असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल. त्यासाठी पुढच्या वेळी मी बैठक बोलवेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर, कृषीचा जीडीपी मोठा असेल

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. पिकाला आवश्‍यक असतो तसाच पाऊस यंदा झाला असून ही गेल्या अनेक वर्षांतील पावसाची सुखद वार्ता म्हणावी लागेल. या पावसामुळे पीक चांगले येईल. त्यामुळे जो काही यंदा जीडीपी वाढेल, त्यात कृषी जीडीपी महत्त्वाचा असेल, असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here