मुंबई: कस्टम अधिकाऱ्याला व्हिस्कीची बाटली खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगून एका व्यक्तीने त्यांची ऑनलाइन केली. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५६ वर्षीय कस्टम अधिकारी काही आठवड्यांपूर्वी ऑफिसमधून लवकरच घरी निघाले होते. संध्याकाळचे चार वाजले होते. दक्षिण मुंबईतील एका रेस्तराँबाहेर चहा घेतला. त्याचवेळी जाताना एक व्हिस्कीची बाटली खरेदी करायची असल्याचे त्यांना आठवले. त्यांनी आपल्या मित्राला फोन केला. डीएन रोडवरील वाइन शॉपचा क्रमांक मागितला. मित्राने त्यांना संपर्क क्रमांक दिला. अधिकाऱ्याने त्या क्रमांकावर संपर्क साधला. वाइन शॉपचा क्रमांक आहे का असं त्यांनी विचारलं. समोरून होकार देण्यात आला. त्याचवेळी एक व्हिस्कीची बाटली पार्सल करण्यास सांगितले. तेव्हा आम्ही फक्त ऑनलाइन पेमेंट स्वीकारतो असे समोरून त्यांना सांगितले. क्रेडिट किंवा डेबिट कार्डविषयीही विचारणा केली. मी सीव्हीव्ही नंबर आणि इतर सर्व डिटेल्स त्या व्यक्तीला दिले.

सुरुवातीला खात्यातून २७३० रुपये काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रेस्तराँजवळ चहा पित बसले होते तेथे बाटली पोहोचवण्यास या अधिकाऱ्याने सांगितले. मोबाइलवर आलेले मेसेज चेक करण्यापूर्वीच ‘वाइन शॉप’मधून पुन्हा कॉल आला. पेमेंट मिळण्याआधीच ते ट्रान्झॅक्शन अपूर्ण राहिले अशी बतावणी करून मोबाइलवर पाठवलेला ओटीपी आणि इतर माहिती द्या असे समोरून सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३६, ०८४ रुपये काढण्यात आले. पहिला ट्रान्झॅक्शन गुरुग्राम आणि दुसरा ट्रान्झॅक्शन मुंबईतून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १४ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here