मुंबई: ‘केंद्र सरकार वादे आणि दावे खूप करत आहे, पण पुढे आणि देश मागे हेच आपल्या देशाचं वास्तव आहे. त्याचे चटके जनतेला सोसावे लागत आहेत,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र ”च्या अग्रलेखातून जगभरातील करोनाच्या स्थितीवर भाष्य करताना देशातील सद्यस्थितीवरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. करोनाच्या साथीनंतर सुरुवातीच्या काळात सहकार्याच्या मुद्दयावरून राज्य सरकारनं अनेकदा टीका केली होती. नंतरच्या काळात ही टीका थांबली. मात्र, करोनाच्या स्थितीवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं टीका करत असतो. शिवसेनेनंही केंद्राच्या आर्थिक पॅकेजचा फायदा झाला नसल्याचं म्हटलं आहे. ‘करोनामुळं जग गेल्या २५ आठवड्यांत २५ वर्षे पीछाडीवर गेले आहे. आपल्या देशापुरता विचार केल्यास केंद्र सरकारनं २० लाख कोटींचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला आहे. मात्र, त्यामुळं अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचं लक्षण तूर्त तरी दिसत नाही,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘गेल्या २५ आठवड्यांत जगाबरोबर भारतही मागे पडला आहे. आधीच गडगडलेली आपली अर्थव्यवस्था करोना आणि लॉकडाऊनमुळं रसातळाला गेली आहे. जीडीपीचा दर कधी नव्हे तो उणे २३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. निर्यातीत घसरण सुरू आहे. ही परिस्थिती म्हणजे भारताच्या विकासाचा ‘रिव्हर्स गियर’ असंच म्हणावं लागेल,’ अशी चिंताही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here