मुंबई: राज्यातील साथीची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून त्यावरून भारतीय जनता पक्षानं राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘कंगना राणावतच्या मागे लागण्यापेक्षा राज्य सरकार करोनाच्या मागे लागले असते तर आज महाराष्ट्राची ही दुरावस्था ओढवली नसती,’ असा टोला भाजपचे आमदार यांनी हाणला आहे.

महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक झाली आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ३ लाखांच्या जवळपास लोक राज्यभरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर लाखो लोक होम क्वारंटाइन आहेत. अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याचं चित्र असून सुविधांअभावी काही रुग्णांना प्राण सोडावे लागल्याचं समोर आलं आहे. मधल्या काळात मुंबईतील करोनाची साथ आटोक्यात आल्याचं वाटत होतं मात्र, पुन्हा एकदा साथीनं डोकं वर काढलं आहे.

वाचा:

करोनाचा संसर्ग वाढण्यास राज्य सरकारचा कारभार जबाबदार असल्याचा भाजपचा आरोप आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’सह वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आलेल्या करोना संबंधींच्या बातम्या ट्वीट करून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘राज्यातील करोना बाधितांची संख्या ११ लाखाहून अधिक झाली आहे. कंगनाच्या मागे लागण्यापेक्षा राज्य सरकार करोनाच्या मागे लागले असते तर आज महाराष्ट्रावर ही दुरावस्था ओढवली नसती. घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आता घराबाहेर पडावं,’ असा खोचक सल्ला भातखळकर यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here