मुंबई/ पुणेः गणेशोत्सव संपताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज रात्री उशिरा हे बदली आदेश काढण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिस आयुक्तांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. गेल्या महिन्यात काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर डॉ. व्यंकटेशम् यांना मुदतवाढ दिल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा गृह विभागाने राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. डॉ. व्यंकटेशम् यांची बदली अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान) या पदावर करण्यात आली आहे. याबरोबरच २२ पोलिस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

बघा कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली….

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here