म.टा.वृत्तसेवा,शिर्डी: प्रवाशांच्या जोरदार प्रतिसादामुळे अल्पावधीत शिर्डी विमानतळावरील हवाई वाहतूक वेगाने वाढली असून, अपुऱ्या पायाभूत सुविधांअभावी विमान तळावरील प्रवासी वाहतूक बेभरवशाची झाली आहे. व्हिजिबिलिटी नसल्याने महिनाभर विमानवाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दिवसभर सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने व इंटरनेट सुविधा बंद पडल्याने कामकाजावर परिणाम झाला. त्याचा फटका प्रवाशांना बसला. , दिल्ली, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, अहमदाबाद, या शहरासाठी रोज २८ विमातातून प्रवासी वाहतूक सुरू आहे.

शिर्डी येथील मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून रोज हजारो भाविक येत असल्याने महाराष्ट्र सरकारने साई बाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली. मात्र, पायाभूत सुविधा नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना आणि भाविकांना बसत आहे. याविषयी विमान प्रवाशांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. पण, अनेक अडथळ्यांची शर्यत अद्यापही प्रवाशांना पार करावी लागत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here