मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं राज्यात सध्या तणाव आहे. काही लोकांकडून यासाठी आधीच्या फडणवीस सरकारला जबाबदार धरलं जात आहे. त्यावर, ‘ब्राह्मण असल्यामुळं काही मोजके लोक माझ्यावर खापर फोडत आहेत,’ असं फडणवीस म्हणाले होते. जनतेला एखादी गोष्ट पटवून देता आली नाही तर संभ्रम निर्माण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे आताचं सरकार जे काही होईल, त्याचं खापर मागच्या सरकारवर फोडण्याचं काम करत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
वाचा:
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस जे म्हणतात तसं आम्हाला काही वाटत नाही. मुळात महाराष्ट्रात जात हा विषय महत्त्वाचा कधीच राहिलेला नाही. या राज्यात दलित आणि मुस्लिम मुख्यमंत्रीही झाले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचं काम आणि धाडस बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण आणि दुसरा मराठा. त्यापैकी ब्राह्मण मुख्यमंत्री चार वर्षांपेक्षा जास्त काळ होते,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
एनडीए तेव्हाच विस्कळीत झाली होती!
अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. ‘कृषी विधेयकावर किमान एनडीएमध्ये चर्चा व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. खरंतर शिवसेनेला जेव्हा एनडीएतून बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आलं आणि शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच ही आघाडी विस्कळीत झाली होती. अन्यथा शिवसेना व अकाली दलाशिवाय एनडीएची कल्पनाच कुणी करू शकत नव्हतं,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times