दलातील हवालदाराचा करोनाने मृत्यू झाला आहे. शहर पोलीस दलातील हा पाचवा बळी आहे. विनोद पोतदार (वय ५१) असे मृत्यू झाालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोतदार हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना रक्तदाबाचा (बीपी) त्रास होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत २० पोलीस अधिकारी आणि १८४ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
करोनाची साथ आल्यापासून पोलीस हे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आघाडीवर राहून लढत आहेत. घराबाहेर पडावे लागत असल्यानं पोलिसांमध्ये संसर्गाचे प्रमाणही अधिक आहे. राज्य पोलिस दलातील ४४७ अधिकारी आणि तीन हजार २८१ कर्मचारी सध्या करोनावर उपचार घेत आहेत. करोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या आतापर्यंत २० हजारच्या पुढे गेली आहे. त्यापैकी १६ हजार ७१ पोलिसांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यातील बहुतांश पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. पोलिसांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही करोनाची लागण होण्याची भीती असल्यानं चिंता अधिक वाढली आहे. याच भीतीने अनेक पोलिस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times