पालकमंत्री या नात्यानं मुश्रीफ अधूनमधून नगरचा दौरा करत होते. सुमारे महिनाभरानंतर गुरुवारी (१७ सप्टेंबर) मुश्रीफ नगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी करोनासंबंधी आढावा बैठक घेतली. प्रशसनातील अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. अनेकांची निवेदने स्वीकारली. पत्रकार परिषदही झाली. त्यानंतर ते कोल्हापूरला परत गेले. कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यांच्या कागल मतदारसंघातही ते सक्रीय आहेत. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ते सुरुवातीपासून काळजी घेत आहे. स्वत: काळजी घेत इतरांना आवाहन करीत आहेत. करोनाच्या सुरवातीच्या काळापासून त्यांनी कधीही मास्क हटविला नाही. बैठका आणि पत्रकार परिषदांमध्येही मास्क लावूनच ते सहभागी होत होते.
वाचा:
अशा परिस्थितीतही त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ही माहिती दिली आहे. ‘माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times