अवाजवी कर्ज व त्याचा परतावा न झाल्याने संकटात आलेल्या पीएमसी बँकेतील काही संचालक तसेच कर्जदारांनी कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर केल्याचा संशय आहे. यामुळेच ईडीकडून या घोटाळ्याचा तपास सुरु आहे. कर्जाऊ रक्कमेचा मनी लॉन्डरिंगसारखा वापर झाला असून तो पैसा इतरत्र वळविण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हा पैसा काही स्थावर मालमत्तेत गुंतविल्याचे दिसून आले होते. यामुळेच ईडीने शुक्रवारी मोठी कारवाई केली.
ईडीच्या सूत्रांनुसार, या घोटाळ्यात कर्ज बुडवलेल्या राकेश वाधवान व अन्य कर्जदारांनी दिल्ली परिसरात फॅब हॉटेल्स खरेदी केले होते. अशी १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या संचालकांची आणखी काही मालमत्ता आहे. ती जप्त करण्याबाबतही विचार सुरु आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times