नवी दिल्ली : कांदा आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात डिसेंबरमध्ये उसळला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर गेला असून गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक दर आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाची पातळी महागाई दराने ओलांडली आहे.

केंद्र सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली. ज्यात डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर गेला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये मूळ महागाई दर ३.७ टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के होता. डिसेंबरमध्ये कांदा १५० रुपयांवर गेला होता. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किमतीत मोठी वाढ झाली.

डिसेंबरमध्ये १४. १२ टक्क्यावर गेला आहे. भाजीपाला महागाई दर ६०.५ टक्के होता. ग्राहकोपयोगी वस्तूंमधील महागाई १.७५ टक्के होती. इंधन दराने मात्र दिलासा दिला. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे २ ते ६ टक्के ठेवले आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी पतधोरण जाहीर होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here