नवी मुंबईः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणाव आहे. येत्या हिवाळ्यात लडाखमध्ये चीनला कसं उत्तर द्यायचं यावर तज्ज्ञ आणि दिग्गजांकडून सतत वेगवेगळे दावे केले जात आहेत. कारण लडाखमधील हिवाळ्यातील कडाक्याची आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून बचावासाठी बरीच तयारी करावी लागते. आणि आता भारत-चीन तणावत लडाखमधील या थंडीने एन्ट्री घेतली आहे.

पँगॉंग सेक्टरमध्ये २९ ऑगस्टपासून तणावाची स्थिती आहे त्या ठिकाणी या आठवड्यापासून पँगाँग सरोवराचे किनारे गोठण्यास सुरवात झाली आहे. फिंगर 4 मध्ये भागात ज्या ठिकाणी भारत-चिनी सैनिक तैनात आहेत तेथील तापमान शून्य ते उणे ४ अंशांपर्यंत खाली आलं आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सरोवराचा पृष्ठभाग पूर्णपणे गोठेल.

उत्तरेतील सब-सेक्टरमध्ये उणे १४ डिग्री तापमान

लद्दाखच्या सब-सेक्टर नॉर्थमध्ये (SSN) डेपसांग आणि दौलत बेग ओल्डी भागात आधीपासूनच तापमान उणे १४ अंशांवर पोहोचले आहे. आणि दिवसागणिक तापमानात घसरत जाईल.

२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दोन्ही बाजूच्या सैनिकांनी इशारा देत आतापर्यंत ४ वेळा हवेत गोळीबार केला आहे. आता लडाखमधील हवामान वेगाने बदलण्यास सुरवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत पीएलएच्या सैनिकांना फिंगर्स भागातील उंच ठिकाणांहून स्ट्रेचरवरून घेऊन जाताना भारतीय जवानांनी पाहिले आहे. तिथे वेगवान वारे आणि अत्यंत थंडीमुळे तेथील स्थिती अधिकच बिघड चालली आहे.

दिवसागणिक स्थिती बिघडत आहे. तिथून हटवण्यात आलेल्या चिनी सैनिकांच्या जागी नवीन सैनिकांना तैनात केले जात आहे. आणि हे सर्व भारतीय लष्कराचे जवान तैनात असेलल्या ठिकाणापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे.

फिंगर 4 मधून हटवण्यात आलेल्या चिनी सैनिकांना फिंगर 6 जवळ उभारण्यात आलेल्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी सैनिकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे डेपसांग भागाच्या दोन्ही बाजूंची फील्ड हॉस्पिटल सुरू झाली आहेत. या ठिकाणी पँगाँग परिसरावरून तणाव कायम आहे.

आता हवामान बदलले

भारत आणि चिनी सैन्याच्या आघाडीवरून चौक्यांवरून एकमेकांवर आणि हवामानाच्या परिणामावर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दोन्ही बाजूचे सैनिक वैद्यकीय स्तरावर एकमेकांना मदत करत होते, अशी स्थिती या ठिकाणी वर्षापूर्वीची होती. पण आता बदललेल्या परिस्थितीत अविश्वास आणि शुत्रत्वाच्या वातावरणामुळे असा विचार करणं आता अशक्य आहे.

भारतीय पोस्टमध्ये देखील विशेष वैद्यकीय उपकरणं आणि स्ट्रेचर्ससह वैद्यकीय सुविधा आहेत. या ठिकाणी धोकादायक फ्रॉस्टबाइट, चिलब्लेन्स आणि हाय अल्डीट्यूड पुलमोनरी ओडेमा (एचएपीओ) अशा वाईट स्थितीचा सामना करणाऱ्या सैनिकांवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांना पँगाँग सरोवरापेक्षाही अधिक उंचीवर राहण्याचा दीर्घ आणि सखोल अनुभव आहे. सियाचीन ग्लेशियर आणि साल्टेरो रिजच्या उंच शिखरांवर वर्षभर भारतीय लष्कराचे जवान तैनात असतात.

पांगोंग हाइट्समध्ये जिथे १६,००० हजार फूट उंचीवर जवान तैनात केले जातात. तर सियाचीनमधील पोस्टला २२,००० फूट उंचीवर जवानांची तैनाती होते. माउंट एव्हरेस्टची उंची २९,००० फूट आहे. अनेक दशकांपेक्षा उंच भागात भारतीय जवान तैनात असल्यामुळे अशा परिस्थितीला तोंड देण्याचा भारतीय लष्कराला दीर्घ अनुभव आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here