डॉ. मनोहर आनंदे यांना रक्तदाबाचा सौम्य त्रास होता. त्यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. मात्र, करोनाशी सुरू असलेली त्यांची झुंज आज सकाळी थांबली. बालरोग तज्ज्ञ म्हणून गेली ४० वर्षे ते प्रॅक्टिस करत होते. चंद्रपूर येथील देलनवाडी गावात जन्मलेल्या आनंदे यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतलं. त्यांनी एमबीबीएस आणि एमडीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर शहरात न जाता चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातच प्रॅक्टिस सुरू केली होती. आनंदे यांचे चिरंजीव डॉ. अजिंक्य हे कन्याकुमारी येथे कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, या आधी चंद्रपुरात वरोराचे डॉक्टर सुनील टेकाम यांचा करोनाने मृत्यू झाला होता. चंद्रपुरात सुमारे ४० डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या भीतीने अनेक डॉक्टरांनी तर त्यांची खासगी प्रॅक्टिसही बंद केली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत करोनाने ३०हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर देशात ३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times