वाचा-
IPLमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (M S Dhoni) आहे. धोनीने १७४ सामन्यापैकी १०४ मध्ये विजय मिळवला आहे. त्याची विजयाची टक्केवारी ५९.८ टक्के इतकी आहे. आता १४ महिन्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला पहिल्याच सामन्यात एक विक्रम करण्याची संधी आहे. धोनीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघाचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.
वाचा-
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने २०९ षटकार मारले आहेत. तर एबीच्या नावावर २१२ षटकार आहेत. जर मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने चार षटकार मारले तर तो एबीला मागे टाकू शकेल.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत ३२६ षटकार मारले आहेत. त्याचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असेल.
धोनीच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक विजयाचा विक्रम देखील आहे. कर्णधार म्हणून त्याने १०४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १००पेक्षा अधिक सामने जिंकणारा ते एकमेव कर्णधार आहे. विकेटकिपर म्हणून त्याने १३२ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये हा एक विक्रम आहे. तर स्टपिंगमध्ये देखील धोनी आघाडीवर आहे. त्याने ३८ वेळा स्टंप केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times