अमेरिकेतील तेल क्षमतेवर चक्रिवादळाचा परिणाम झाल्याने तेथील तेलसाठ्यात घट झाली. परिणामी कच्च्या तेलाचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
कच्च्या तेलाच्या दरात ४.९ टक्क्याची वाढ होऊन ते ४०.२ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावले. अमेरिकी तेल उत्पादन क्षमतेला वादळाचा फटका बसल्याने तेलसाठ्यात घट झाली. परिणामी क्रूडच्या दरांना आधार मिळाला. सॅली नावाचे चक्रिवादळ अमेरिकेतील आखाती किनाऱ्यावर धडकल्यामुळे अमेरिकी किनारपट्टीवरील एकूण तेल उत्पादनापैकी एक पंचमांशांपेक्षा जास्त प्रक्रियेवर परिणाम झाला. तसेच प्रमुख निर्यात क्षेत्र बंद ठेवावे लागले आहेत. अमेरिकेच्या अंतर्गत विभागाच्या अहवालानुसार, जवळपास मेक्सिकोतील गल्फचे दररोज ५००,००० बॅरलचे उत्पादन ठप्प झाले.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने नोंदवले की, रॉयटर्सच्या १.३ दशलक्ष डॉलरच्या वृद्धीच्या अंदाजाच्या तुलनेत डब्ल्यूटीआय क्रूड साठे ४.४ दशलक्ष बॅरलने घसरले. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लिबियन तेलाचे उत्पादन सुरू झाले. तथापि, साथीच्या काळात मागणीची चिंता आणि अमेरिकी डॉलरचे मूल्य सुधारल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली.
अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने इतर चलनधारकांना बेस मेटल महाग झाले. परिणामी एलएमईवर बेस मेटस्लचे दर सकारात्मक स्थितीत बंद झाले. तसेच, अमेरिका आणि चीनदरम्यानचे संबंध सुधारत असल्याने किंमतीतील नुकसानही मर्यादित राहिले. नॅशनल स्टॅटिस्टिक ब्युरोच्या अहवालानुसार, चीनमध्ये औद्योगिक कामकाज आणि रिटेल विक्रीने वेग घेतला असून ऑगस्ट २०२० मधी चीनचे औद्योगिक उत्पादन ५.६ टक्क्यांनी वाढले. तसेच जून २०२० मध्ये जागतिक झिंक मार्केटमधील सरप्लसमध्ये २००० टनांपर्यंत घट झाली. एलएमई कॉपरचे दर ०.२३ टक्क्यांनी वाढले व ६७७७ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. कारण ऑगस्ट २०२० मध्ये रिफाइन्ड तांब्याचे उत्पादन ८.९४,००० टनांनी वाढले. डॉलरचे मूल्य वधारत असल्याने लाल धातूच्या किंमती घसरू शकतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times