वाचा-
चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, चेन्नईविरुद्धची लढत नेहमीच चांगली होती. त्यांच्याविरुद्ध खेळायला आवडते.
वाचा-
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीत मुंबईने १७ वेळा विजय मिळवला आहे. तर चेन्नईने ११ वेळा सामना जिंकला आहे. यापैकी प्लेऑफमधील पाच लढती मुंबईने तर चेन्नईने चार लढती जिंकल्या आहेत.
वाचा-
वाचा-
अंतिम सामन्याचा विचार करता मुंबईने चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. यापैकी ३ वेळा अंतिम सामन्यात चेन्नईचा पराभव केला आहे. तर चेन्नईने अंतिम सामन्यात एकदाच २०१० मध्ये मुंबईचा पराभव करून विजेतेपद मिळवले आहे.
वाचा-
मुंबई विरुद्ध चेन्नई अंतिम लढत
२०१०- चेन्नईचा मुंबईवर २२ धावांनी विजय
२०१३- मुंबईचा चेन्नईवर २३ धावांनी विजय
२०१५- मुंबईचा चेन्नईवर ४१ धावांनी विजय
२०१९- मुंबईचा चेन्नईवर १ धावाने विजय
स्पर्धेतील सर्वात जास्त २४ सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. अबूधाबीमध्ये २० तर शाहजाहमध्ये १२ सामने होणार आहेत. प्ले ऑफ आणि फायनल सामन्याचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही. ४६ दिवसात साखळी फेरीतील सामने पूर्ण होतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times