मुंबई: मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगणा राणावत यांना राज्यपाल यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. महामहीम राज्यपालांवर त्यासाठी दबाव होता का? ही साशंकता जनतेत आहे. परंतु राज्यपालांनी कंगनाला भेट दिली तरी ज्या त्वरेने मुख्यमंत्र्यांचे सल्लागार यांना बोलावणे धाडले तशीच कंगना यांची कानउघाडणी केली असती तर महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी म्हटले आहे. ( Questions Over and Meeting )

वाचा:

राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांचीच असते म्हणून मुंबई, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या यांना त्यांनी चार शब्द सुनवायला हवे होते, असे सावंत म्हणाले.

वाचा:

कंगना राणावत राज्यपालांच्या भेटीसाठी गेली असता नमस्कार करून राज्यपालांच्या आधीच आसनस्थ झाली होती. त्यावरही काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी मतप्रदर्शन केले. ‘कसलेच ताळतंत्र नसलेल्या तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर बोलणाऱ्या कंगना यांनी राज्यपालांचाही अवमानच केला आहे. राज्यपालांच्या भेटीवेळी त्यांनी महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून आमच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे’, असे सावंत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here