मुंबई: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून आज सरकारमधील आणखी एक मंत्री यांना संसर्गाची लागण झाली आहे. कडू यांनीच याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे. ( Tests Positive For )

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करोना चाचणी करून घेतली असता या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन ट्विटद्वारे कडू यांनी केले आहे.

बच्चू कडू यांच्याआधी कालच राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व ग्रामविकास मंत्री यांचा करोना चाचणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्याबाबत त्यांनी तातडीने माहिती देतानाच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी म्हणून चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here