मुंबई: राज्यात आज रुग्णांचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. शुक्रवारी २२ हजारावर रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतर आज एकाच दिवशी विक्रमी २३ हजार ५०१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. आजवरचा हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) वाढून आता ७२.२२ टक्के इतका झाला आहे. ( Latest News )

राज्यात आज आणखी ४२५ करोनामृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यातील २५५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, १२२ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत तर उर्वरित ४८ मृत्यू हे त्याआधीचे आहेत व त्यांची नोंद आता करण्यात आली आहे. राज्यात आता करोनामृत्यूंचा एकूण आकडा ३२ हजार २१६ इतका झाला असून मृत्यूदर सध्या २.७१ टक्के इतका आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात २१ हजार ९०७ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १२ लाखांच्या आणखी जवळ पोहचली आहे. हा आकडा आज ११ लाख ८८ हजार १५ इतका झाला असून त्यापैकी ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, ३२ हजार २१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १ लाख ९७ हजार ४८० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. (अॅक्टिव्ह रुग्ण) ३८६ मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ८६ हजार १७४ व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत व त्यातील २०.५३ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या १८,०१.१८० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३९ हजार व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत पाच हजारावर रुग्ण झाले बरे

मुंबई शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून नवीन बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंतेत भर पडली होती. आज मात्र काहीसा दिलासा मिळाला. आज एकाच दिवशी मुंबईत तब्बल ५ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर २ हजार २११ नवीन रुग्णांची नोंद दिवसभरात झाली व ५० रुग्ण करोनाने दगावले. मुंबईत सध्या ३० हजार ३१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून आज ही संख्या ७९४८९ इतकी होती तर जिल्ह्यात २९६२६ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here