वाचा:
महानगरपालिकेच्यावतीने करोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी सतेज पाटील बोलत होते.
वाचा:
शहरातील करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी महापालिका यंत्रणेने अधिक दक्षता घेऊन उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, होम टू होम सर्व्हे करताना अधिक जागृकता आणि सतर्कता बाळगणे गरजेचे असून या सर्व्हेतून एकही व्यक्ती सुटता कामा नये. हा सर्व्हे अधिक दक्षतेने आणि प्रामाणिकपणे करावा. जेणेकरुन व्याधीग्रस्त आणि करोना सदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रितरित्या संकलीत होईल. त्यामुळे एकत्रित डेटा तयार होऊन त्यानुसार पुढील नियोजन आणि उपाययोजना करणे सोयीचे होईल.
वाचा:
शहरातील करोना संसर्ग रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनेचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार पुढील काळात करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशी सूचना करून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, फिल्डवरील अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क होऊन आता काम करण्याची गरज आहे. यावेळी महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री पाटील, महापौर व आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्यासह महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times