आग्रा येथील म्युझियमच्या नामांतराच्या निमित्तानं संजय राऊत यांनी ‘सामना’त लेख लिहिला आहे. ‘आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजीराजे पोहोचले व त्यांनी औरंगजेबाच्या हातातली तलवार खेचून घेतली असेच नाट्य जणू घडत आहे. आग्य्रातील ‘मुगल म्युझियम’चे नाव मुख्यमंत्री योगी महाराजांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले. यात श्रद्धा, आदर, तितकेच भविष्यातले राजकारण आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहण्याइतकेच हे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म आहे. देशाचा ‘महानायक’ मुगल कसा असू शकतो? तो हिंदुपदपातशहाच असू शकतो. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत हे योगींना दाखवून द्यायचे आहे. उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले. यामागे थोडी राजकीय विचारांची ठिणगी असायला हवी,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक अद्यापि उभे राहिलेले नाही. डॉ. आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन आता झाले आहे. शिवरायांचे गडकिल्लेही जीर्ण अवस्थेत पोहोचले आहेत. या सगळ्यात योगी महाराजांनी ‘मुगल म्युझियम’चे नाव बदलून फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले. याचे राजकीय पडसाद उमटतील. यापूर्वी महाराष्ट्राचे डॉ. आंबेडकर व आता छत्रपती शिवाजी महाराज उत्तर प्रदेशच्या राजकीय मैदानात उतरवले जातील. म्हणजे आधी श्रीराम आता छत्रपती शिवाजी महाराज! २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांच्या बरोबरीने शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरून मते मागितलीच गेली होती. छत्रपतींचे आशीर्वाद आम्हालाच असा प्रचार तेव्हा झाला. आता उत्तर प्रदेशात राममंदिर व शिवाजीराजे म्युझियम यांना महत्त्व येईल,’ असा अंदाज राऊत यांनी वर्तवला आहे.
वाचा:
योगींच्या निर्णयाच्या निमित्तानं राऊत यांनी महाराष्ट्रातील आंबेडकरवादी पक्षांच्या राजकारणावर टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाणे खणखणीत पद्धतीने वाजवले. आंबेडकर महाराष्ट्राचे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रात राजकीय सूर्य उजाडत नाही, पण महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांची ओळख ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ अशी झाली आहे. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात. याउलट ‘आंबेडकरां’च्या विचारांचा वारसा सांगणारा, दीनदुबळय़ा दलितांना न्याय देणारा ‘आंबेडकरी पक्ष’ म्हणून मायावतींचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला व राष्ट्रीय राजकारणातही स्थिरावला. आंबेडकर हे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाऊन स्थिरावले त्यास कारणे आहेत. इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्या ‘कंगना’ नावाच्या नटीच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी ‘मुंबई महाराष्ट्राचीच’ असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या नटीच्या स्वागतास ‘आंबेडकरी’ विचारांचा एक पक्ष पोहोचतो हा आंबेडकरांचा अपमान आहे. असे वैचारिक द्रोह कांशीराम यांनी केले नाहीत व मायावती यांनाही ते करता आले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात डॉ. आंबेडकर त्यांना देवाप्रमाणे पावले,’ असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very nice post. I simply stumbled upon your blog and wished to mention that I have truly loved browsing your weblog posts.
카지노사이트킴
Great articles and great layout. Your blog post deserves all of the positive feedback it’s been getting.
카지노사이트넷
I wish to take this opportunity to complement your website. You are doing a great service! 먹튀검증