बॉलिवूड अभिनेत्री हिनं अनुरागवर आरोप केलेत. यासंदर्भात तिनं एक ट्विट देखील केलं आहे. ‘अनुराग कश्यप यान माझ्यासोबत असभ्य आणि गैरवर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली गेली होती. या व्यक्तीवर कारवाई करा. या माणसाचं खरं रुप सर्वांसमोर येईल. माझ्या या ट्विटमुळे माला जीवाला धोका असून माझी मत करा’, असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट करताना पायलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे आणि त्याच्याकडे मदत मागितली आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर अनुरागनं वेळोवेळी त्याचं मत मांडलं आहे. तसंच कंगना राणावत आणि अनुराग कश्यप याच्यात ट्विटवरवर शीत युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
अनुरागने आरोप फेटाळले
पायल घोष हिनं केलेले सर्व आरोप अनुरागनं फेटाळले आहे. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस,शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत’, असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये आहे.
दरम्यान, अद्यापही पायलनं अनुराग विरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाहीए. याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी घेतली असून या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यास सांगितलं आहे.
कंगनाचा पाठिंबा
पायलनं अनुरागवर आरोप केल्यानंतर कंगनानं पायलच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक आवाज महत्त्वाचा असं म्हणत तिनं अनुराग कश्यप याला अटक करण्याची मागणी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times