मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारचा विरोध आहे. अत्यावश्यक सेवेतील व अन्य काही कर्मचाऱ्यांना रेल्वे सेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळं मुंबईकरांच्या प्रवासाचा प्रश्न सुटलेला नाही. रिक्षा, टॅक्सी व अन्य पर्याय लोकांना परवडणारे नाहीत. बेस्ट बस सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

वाचा:

याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबईतील बेस्ट बसमधील गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले होते. रेल्वेच्या गर्दीनं करोना होतो, बसमधील गर्दीनं होत नाही का, असा प्रश्न देशपांडे यांनी सरकारला केला होता. तसंच, रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. अन्यथा, सविनय कायदेभंग करत २१ सप्टेंबर रोजी लोकल प्रवास आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी कायदेशीर कारवाईची ताकीद दिली आहे. मात्र, मनसे आंदोलनावर ठाम आहे.

वाचा:

उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुंबईतील ४५ लाख प्रवाशांसाठी लढत असल्याबद्दल महासंघानं मनसेचे आभार मानले आहेत. खासगी नोकरदारांचा सर्व्हे करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी महासंघानं केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here