मुंबई: मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – ) तशी विनंती केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असं कर मंडळानं म्हटलं आहे.

वाचा:

खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. याआधी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिल्या जात. मात्र, या भूमिकेत निवडणूक आयोगानं आता बदल केला आहे. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचं आयोगानं ठरवलं आहे.

एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.


वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here