अहमदनगर: रुग्णसेवेत हेळसांड होत असल्याचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. नगरहून पुण्याला हलविण्यात येत असलेल्या एका महिला रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आला होता. मात्र, देखभालीसाठी सोबत देण्यात आलेले डॉक्टर सिगारेट ओढत होते आणि मोबाईलवर गाणी ऐकत असल्याचे पुढे आले आहे. पुण्यात उपचार घेत असलेल्या या रुग्णाने आपल्या पतीला हा प्रकार सांगितल्याने याला वाचा फुटली.

नगर शहरातील एका महिलेला श्वसनाचा त्रास होत होता. सुदैवाने चाचणी निगेटिव्ह आली. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अधिक उपचारांसाठी पुण्याला हलवावे, असा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे एक खासगी सुसज्ज रुग्णवाहिका घेऊन रुग्णाला पुण्याला हलविण्यात आले. पुण्यात उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

वाचा:

आता या महिलेने आपल्या पतीला रुग्ण्वाहिकेत घडलेल्या या भयानक घटनेची माहिती दिली. २० हजार रुपये भाडे देऊन ही सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात आली होती. त्यामध्ये देखभालीसाठी डॉक्टरही होते. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक होते. मात्र, या महिलेने आपल्या पतीला सांगितले की, रुग्णवाहिकेतील डॉक्टर ए.सी. रुग्णवाहिकेत सिगारेट ओढत होते. मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत होते. नगर ते या संपूर्ण प्रवासात रुग्णाकडे लक्ष देण्याऐवजी डॉक्टर स्वत:तमध्ये दंग झाले होते. सुदैवाने रस्त्यात काही अनुचित प्रकार घडला नाही. पत्नीने सांगितलेला हा प्रकार ऐकून पती हादरून गेले.

वाचा:

या महिलेचे पती नगरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य करतात. शहरातील अनेक सार्वजनिक स्वरूपाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. करोना काळातील उपाययोजना आणि त्यातील त्रुटींकडेही त्यांनी प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. काही प्रकरणांत त्यांनी न्यायालयीन लढेही दिले आहेत. आता त्यांच्याच पत्नीच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने त्यांनी याचा पाठपुरावा सुरू केला आहे. ज्या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांना ही रुग्णवाहिका देण्यात आली होती, तेथील डॉक्टरांना त्यांनी ही माहिती दिली आहे. गंभीर रुग्णाला घेऊन जात असताना डॉक्टर इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here